
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर ( सिनेट ) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अधिसभेच्या अध्यक्षांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे पत्र आमदार जावळे यांना प्रदान करण्यात आले आहे. ते आमदारांच्या कोट्यातून सिनेट सदस्य बनले आहेत.
आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या नियुक्तीचे स्वागत करून आमदार जावळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



