जळगाव, प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालय एन.सी.सी. युनिट च्या छात्र सैनिकांनी खेळ मंत्रालयाने आयोजित केलेय फिट इंडिया मोहिमेत (१५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२०) दरम्यान पहिल्या टप्प्यात आठवड्यातून पाच दिवस शारीरक स्वास्थ्यासाठी धावणे सुरु केले आहे.
मूळजी जेठा महाविद्यालातील एन.सी.सी.च्या १५ छात्र सैनिकांनी मोहिमेच्या प्रसारासाठी आपआपल्या क्षेत्रात सुरक्षा नियम पाळून धावणे सुरु केले. या मोहिमेचा उद्देश समाजात शारेरिक स्वास्थ्य बहालीचा संदेश देणे हा होता. १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालीयन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल सत्यशील बाबर, सुभेदार मेजर कोमल सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. भारंबे, एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. डॉ. बी. एन. केसुर आणि लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.