मू.जे. महाविद्यालयात संस्कृत विभागाच्या वतीने डॉ. वसंत भट यांचे व्याख्यान

IMG 20190826 WA0087

जळगाव, प्रतिनिधी | स्वायत्त मू.जे. महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या वतीने दि. १९ ते २६ दरम्यान संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृत दिनाच्यानिमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. वसंत भट यांचे “अभिज्ञान शाकुंतलातील प्रतिमा स्थाने” या विषयावर व्याख्यान झाले.

व्याख्यानात प्रा. डॉ. भट म्हणाले की, शाकुंतल हे जग प्रसिद्ध नाटक असून या नाटकाच्या मूळ पाडूलीपीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी १०० हस्तलिखितांचे संशोधन करून अभिज्ञान शाकुतलम मध्ये अनेक प्रतिमा स्थळे आली आहे हे प्रतिपादन केले. सामान्य लोकांना अंगठी हेच प्रतिमा स्थळ माहित होते. परंतु अभिज्ञान, हरीण, कमळपुष्प (शकुंतलेचे प्रतिक ) शिरीषपुष्प(मेनकेच प्रतिक) भ्रमर (दुष्यंताचे प्रतिक), मासा, आश्रम, परभृतिका, चक्रवाक, हंस , आम्रमंजिरी इत्यादी सुद्धा प्रतिमा स्थळे आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले अतिशय सध्या सरळ सोप्या भाषेत त्यांनी समजाविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार प्रा. डॉ. अखिलेश शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. प्रीती शुक्ल आणि पवन सोनार यांनी केले. सप्ताहातर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ.वसंत भट यांच्या हस्ते करण्यात आला.

Protected Content