Home Cities अमळनेर Missing : झाडी येथील वृद्ध दोन दिवसांपासून बेपत्ता

Missing : झाडी येथील वृद्ध दोन दिवसांपासून बेपत्ता

0
48


अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील झाडी येथील सुकलाल काळू देवरे (मिस्तरी) हे 83 वर्षीय वृद्ध मंगळवार, दि.19 एप्रिल 2022 रोजी 9 वाजेच्या सुमारास राहत्या घरून निघून गेले असून मारवड पोलीस ठाण्यात ते हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

सुकलाल देवरे हे नेहमी प्रमाणे सकाळी बस स्टैंडवर जावून येतो असे सांगून घराबाहेर पडले; मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने त्यांचा तपास घेतला असता ते मिळून आले नाहीत. यानंतर सर्वत्र नातेवाईक यांच्याकडे संपर्क केला असता तेथेही ते नसल्याचे कळाल्याने त्यांचा मुलगा शिवाजी देवरे यांनी मारवड पोलीस ठाण्यात आज दि.20 एप्रिल रोजी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

ते कोणाला दिसल्यास किंवा त्यांच्याविषयी काही माहिती मिळाल्यास 9021202650 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound