अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले ; अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील लक्ष्मी नगर कानळदा रोड भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , लक्ष्मी नगर कानळदा रोड भागात राहणारी 17 वर्षीय मुलीला 10 जून रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याबाबत मुलीच्या पालकांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलिसात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गु.र.नं. 83/ 2019 भा.द.वि. कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content