अमळनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात राहणारा १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा हात पकडत विनयभंग केल्याची घटना १४ जून रोजी सकाळी आठ वाजता घडली होती. याप्रकरणी गुरुवारी २० जून रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात १३ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गावात राहणारा संशयित आरोपी कमलेश आसाराम बाविस्कर हा १४ जून रोजी सकाळी ८ वाजतापीडित मुलगी ही घरी एकटी असताना घरात घुसला. त्यानंतर तिचा हात पकडून तोंड दाबून अश्लिल चाळे केले. दरम्यान पीडित मुलीची मावशी आल्याने तो मागच्या खिडकीतून पळून गेला. दरम्यान ही घटना पीडीतेने नातेवाईकांना सांगितली. या घटनेबाबत गुरुवारी २० जून रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी कमलेश आसाराम बाविस्कर यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहे.

Protected Content