
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्या सोबत जबरदस्ती फोटो काढून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. जून २०२५ पासून गावात राहणारा संशयित आरोपी प्रदीप उर्फ बंटी विनोद जाधव राठोड हा पिडीत मुलीशी गोड बोलून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने पिडीत मुलीला जीवे मारण्याची धमकी देवून तिला फोनवर बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर कॉलेजाच्या बाहेर येवून तिच्या सोबत जबरदस्ती फोटो काढून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विनोद राठोड याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.



