Home क्राईम घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या राहत्या घरी एकटीच होती. हीच संधी साधून गावातीलच संशयित आरोपी किसन प्रकाश बेलदार याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. आरोपीने पीडितेचा हात धरून तिला ओढले आणि मिठी मारली. “मी तुझ्यावर प्रेम करतो, तू पण माझ्यावर प्रेम कर” असे म्हणून त्याने पीडितेचा विनयभंग केला.

ही घटना घडल्यानंतर पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी किसन बेलदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound