जळगाव-लाईव्ह ट्रेंडस नयूज प्रतिनिधी । शहरातील एका परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ही घटना घडली असून, या प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत जळगावातील एका भागात वास्तव्याला आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ती घरी असताना, अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावली आणि पळवून नेले. मुलगी परत न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही सापडली नाही. यानंतर, मुलीच्या पालकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी करत आहेत.




