Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

0
107


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १० फेब्रुवारी रेाजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनीपेठ पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, मंगळवारी १० फेब्रुवारी रेाजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound