Home Cities अमळनेर गणपती विसर्जन मिरवणुकीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

गणपती विसर्जन मिरवणुकीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

0
252

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अमळनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनीवार ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता शिवशक्ती चौकात मिरवणूक पाहत असताना एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्दीचा फायदा घेत पळवून नेल्याचा संशय
अमळनेर शहरातील कोष्टीवाडा परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तिच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार ६ सप्टेंबर रोजी रात्री १० ते ११.३० वाजेदरम्यान ते आपल्या मुलीसोबत गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शिवशक्ती चौकात होते. मिरवणुकीतील प्रचंड गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली.

पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेका अशोक साळुखे हे करत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने पावले उचलली असून, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर मार्गांनी तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound