
औरंगाबाद (वृत्तसंस्था) वंचित आघाडीसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर एमआयएम आता राज्यात स्वबळावर ७४ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
खासदार इम्तियाज जलिल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सध्या एमआयएम ७४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. तूर्त औरंगाबादमध्ये आज मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. तर टप्प्याटप्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयएम सोबत दलित मराठा आणि ओबीसी समाज असल्याचा दावा खा.जलील यांनी यावेळी केला. तसेच वंचित बहुजन आघाडी सोबत एमआयएमची आघाडी झालेली नसल्याने अनेक पक्षातील नेत्यांनी एमआयएमशी उमेदवारीशी संपर्क करीत असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली.