Home राजकीय काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा मनसेकडून प्रचार; कार्यालयातही केले स्वागत

काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा मनसेकडून प्रचार; कार्यालयातही केले स्वागत


milind devra
 

मुंबई (वृत्तसंस्था) दक्षित-मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आज मनसे कार्यालयाच्या शाखेला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मनसे-काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. एवढेच नव्हे तर, मिलिंद देवरा यांच्या प्रचार रॅलीत मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेत त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

शिवाजी पार्क परिसरात संदीप देशपांडे व काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार केला होता. आधी एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करणाऱ्या मनसेने आता मिलिंद देवरा यांचा प्रचार केल्याने मनसेचे कार्यकर्ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतली असली तरी राज ठाकरे १० ते १२ प्रचार सभा घेणार असून या सभेतून ते सेना-भाजपवर टीका करणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाविरोधात राज्यात सभांतून चौफेर फटकेबाजी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना-भाजपवर सडकून टीका करणाऱ्या मनसेने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांबद्दल नरमाईची भूमिका घेतली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound