Home क्राईम खुन्नस देण्याच्या वादातून दोघांकडून मायलेकाला मारहाण !

खुन्नस देण्याच्या वादातून दोघांकडून मायलेकाला मारहाण !


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात किरकोळ कारणावरून एका तरुण आणि त्याच्या आईला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ‘खुन्नस देऊन बघण्या’च्या कारणावरून झालेल्या या वादात दोन जणांनी मायलेकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारा राजेंद्र शिवाजी पाटील शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गावात होता. त्यावेळी गावातीलच प्राण संजय पाटील आणि त्याचे वडील संजय पाटील यांनी त्याला ‘खुन्नस देऊन बघण्या’वरून जाब विचारला. यातून त्यांच्यात वाद झाला आणि प्राण व संजय पाटील यांनी राजेंद्रला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी भांडण सोडवण्यासाठी राजेंद्रची आई ललिता शिवाजी पाटील तिथे आल्या. परंतु, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. मायलेकाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. या मारहाणीत राजेंद्र आणि त्याच्या आईला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर ललिता पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, प्राण संजय पाटील आणि संजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकुंद पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound