हिंजवडी आयटी पार्कमधील ३७ कंपन्याचे राज्याबाहेर स्थलांतर

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |पुण्यातील हिंजवडीचा भाग हा आयटी कंपन्यांनी व्यापून घेतला आहे. परंतु आता याच कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत आयटीतील सुमारे ३७ कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केलेत, असा मोठा दावा उद्योजक आणि हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने आहे. इतकेच नव्हे तर आता पुन्हा एकदा आयटी पार्कमधील इतर कंपन्या स्थलांतरित होतील, असेही असोसिएशनने म्हणले आहे.

पुणे शहरातील पिंपरी चिंचवड आणि हिंजवडीचा भाग आयटी क्षेत्रामुळे सर्वात जास्त चर्चेत आला. मात्र असे असतानाही या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास अजूनही झालेला नाही. यासह वाहतूक कोंडीची समस्या आहे अद्याप सुटू शकलेली नाही. सध्या हिंजवडीतील आयटी कंपन्या अनेक अडचणींना सामोरे जात आहे. त्यामुळेच या आयटी कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे या कंपन्या स्थलांतरित झाल्यानंतर त्याचा मोठा फटका पुण्याला बसेल असे म्हटले जात आहे.

बार्कले, नाईस, क्रेडिट स्विस, ल्युमीडेक्स यांसारख्या 20 पेक्षा अधिक बड्या कंपन्या आतापर्यंत दुसऱ्या भागात स्थलांतरित झाल्या आहेत. यामध्ये वेंचुरा टेक्नॉलॉजी, टी क्यूब सॉफ्टवेअर अशा कंपन्यांचाही समावेश आहे. तसेच, बाणेर,खराडी भागातील ही कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित झाल्या आहेत. येत्या काळामध्ये इतरही अनेक कंपन्या स्थलांतरित होतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यानंतर याचा सर्वात मोठा परिणाम तरुणांच्या रोजगारावर पडणार आहे.

दरम्यान हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या लोकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यात सकाळी आणि संध्याकाळी तर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. तसेच आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना इतरही समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या सर्व समस्यांवर सरकार तोडगा कधी काढणार याबाबत सतत प्रश्न विचारले जात आहेत.

Protected Content