जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परप्रांतीय कापड व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून तीन जणांनी ५३ हजार ४५० रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सिल्व्हर प्लॉझा लॉज येथे झाल्याची घटना बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी मध्येरात्री १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या तिन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेरठ येथील रहिवाशी असेलेल इकरार इसरार अहमद (वय ३०) हे कापड व्यापारी आहेत. कामाच्या निमित्ताने इकरार अहमद हे बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी जळगावातील सिल्व्हर प्लॉझा लॉज येथे आलेले असतांना त्यांचे ओळखीचे अफजल याच्यासह आरी आणि असलम (तिघांचे पुर्ण नाव माहित नाही) यांनी १ लाख ३ हजार ४५० रूपये किंमतीचे ब्लँकेटचे ४५० नग विकत घेतले. त्यांच्या मोबदल्यात त्यांना ५० हजार रूपये ऑनलाईनपध्दतीने पमेंट देण्यात आले. परंतू उर्वरित रक्कम ५३ हजार ४५० रूपये हे दिले नाही. वारंवार पैशांसाठी तगादा लावला परंतू पैसे दिले नाही. म्हणून अखेर इकरार इसरार अहमद यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अफजल याच्यासह आरी आणि असलम (तिघांचे पुर्ण नाव माहित नाही) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे हे करीत आहे.




