Home क्राईम मध्यरात्री तरूणाच्या खुनाने हादरले भुसावळ : परिसरात खळबळ

मध्यरात्री तरूणाच्या खुनाने हादरले भुसावळ : परिसरात खळबळ


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील नेब कॉलनी परिसरात रात्री उशीरा किरकोळ वादातून झालेल्या घटनेत एका तरूणाचा खून करण्यात आल्याने परिसर हादरला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाने हादरले आहे. ही भयंकर घटना रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली. शहरातल्या आनंद नगर भागाला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात ही घटना घडली. यात अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे ( वय ४२ ) या तरूणाचा एकाशी किरकोळ वाद झाला. यातून झालेल्या बाचाबाचीत त्याने सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलाने येथे धाव घेतली. यात डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक राहूल वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनी तपासाची चक्रे फिरवून या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. तर या घटनेच्या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मयत तरूणाच्या आप्तांनी केली आहे.


Protected Content

Play sound