जळगाव (प्रतिनिधी)। औद्योगिक वसाहतीतच्या एम सेक्टरमध्ये असलेल्या महालक्ष्मी दालमीलजवळ असलेल्या रस्त्यावर मातीच्या ढिगार्यावरून एका तरूण कामगार कंत्राटदार घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मयत तरूणाच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांना मृतदेह थेट एमआयडीसी पोलीस स्थानकात आणला आणि संताप व्यक्त करत बेजबाबदार ठेकेदारासह औद्योकीय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, एमआयडीसीतील एन सेक्टरमध्ये सांडपाणी निचर्यासाठी गटारीचे कामे सुरु आहेत. तीन ते चार दिवसापूर्वी महालक्ष्मी दाल मिल समोर गुरांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौद आहे. येथे जमलेले सांडपाणी निचरा होण्यासाठी तेथून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गटारीमध्ये हे घाणपाणी जाण्यासाठी रस्त्याच्या मधून पाईप टाकण्यात आला. हा पाईप टाकत असतांना रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. पाईप बुजून झाल्यावर त्याठिकाणी असलेली माती कामगारांनी त्या पाईपावरच मोठ्या प्रमाणावर ढिग लावून ठेवले होती. ढिगार्यामुळे सुदर्शन चटई कंपंनीमध्ये कंत्राटी कामगाराचा ठेकेदार असलेला सुधाकर नगरमधील रहिवासी मुळ राहणार रिवा मध्यप्रदेश बिपिनसिंग राजरमणसिंग (वय-32) हा रात्री 10.40 मि. दुचाकीने (एमएच 19 डब्ल्यु 6068) या दुचाकीने जात असतांना ढिगार्यावर घसरून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा होत. तो घटनास्थळीच मयत झाला. या अपघातामुळे एम सेक्टर परिसरात काम करणारे कामगार संतप्त झाले होते. त्यांनी बिपीनसिंग याचा मृतदेह थेट एमआयडीसी पोलिसात आणत संबंधीत ठेकेदार व एमआयडीसी प्रशासनाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम भूमिका घेतली होती. अपघातात मृत्यूमुखी पडलेला बिपीनसिंग याचा दिड वर्षापूर्वी विवाह झालेला होता. त्याची पत्नी सध्यस्थितीत गर्भवती असल्याचे समजते. याबाबत एमआयडीसी पोलिस स्थानकात घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल करावा की नाही, पोलीसांची भूमीका अजून स्पष्ट झालेली नव्हती.