जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून आज नवव्या दिवशी गणरायाचे ढोल ताश्याच्या गजरात विसर्जन करण्यात आले.
गेल्या 12 वर्षांपासून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाही पोलीस निरीक्षण रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज बप्पाचा नवव्या दिवशी ढोल ताश्यांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी विसर्जनाच्या वेळी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांनी ढोल ताश्याच्या गजरावर ठेका धरला होता.