जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून अटक असलेला संशयित आरोपी साईदास भगवान राठोड, वय 18 वर्ष, रा. मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी, मेहरुण याच्याकडून 13 मोबाईल व चांदीचे नाणे व रोख रक्कम असा एकूण 93 हजाराचा मुद्देमाल हस्तगति केला आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
रामेश्वर कॉलनीतील हॉटेल व्यावसायिक संदिप रमेश सोनवणे यांच्या घरातून 26 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे साहित्य व रोख रक्कम चोरी झाल्याचा तसेच याच गल्लीतील अक्षय रतनसिंग राजपुत व सुरेश बाबुराव मोरे यांचे सॅमसंग व ओपो कपनीचे मोबाईल चोरी केले, अशा दोन्ही घटनांप्रकरणी एम.आय.डी.सी. पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, साईदास याचे वडील हातमजुरी करतात. कमी वयात व्यसने लागली, ती पूर्ण करण्यासह मौजमजेसाठी साईदास गुन्हेगारीकडे वळला. एमआयडीसी पोलिसात साईदास विरोधात पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
93 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
कुठलाही कामधंदा नसतांना साईदास राठोड हा मौजमजा करीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसीचे पोलीस नाईक विजय पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पोलीस नाईक विजय पाटील, मनेाज सुरवाडे, पो.कॉ.अशोक सनगत, सचिन पाटील, हेमंत कळसकर, असीम तडवी यांनी साईदास ला अटक केली. त्याने गुन्ह्यातील एैवज काढून दिला होता. पोलीस कोठडीत त्याची चौकशी केला असता, त्याने इतर ठिकाणाहून चोरी केलेले 13 मोबाईल, एक हजार रुपये रोख, व 1500 रुपये किमतीचे चांदीचे प्रत्येकी 1 ग्रॅम वजनाचे नाणे असा 93 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.