जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या रायपूर फाट्यावर हातात तलवार घेवून दहशत माजविणार्या २० वर्षीय तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी आज अटक केली. त्याच्या ताब्यातील तलवार जप्त करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर शहा शरीफ शहा वय २० रा. रायपूर, कुसूंबा ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना रायपूर फाट्यावर तरुण तलवार घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, हेमंत कळस्कर, योगेश बारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने कारवाई करत तलवारीसह संशयित समीर शहा याला कुसुंबागावाजवळील फाट्याजवळ अटक केली. त्याच्या ताब्यातील ५०० रूपये किंमतीचा तलवार हस्तगत केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.