जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनी मेहरूण परिसरात वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा खून करून फरार असलेला संशयित आरोपीला एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात त्याच्यावर दोन खूनाचे गुन्हे दाखल आहेत.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील मेहरूण परिसरात राहणारा सुरेश बंजारा याला अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ६ फेब्रुवारी २०२१ रोजी संशयित आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत रा. मेहरूण आणि त्याचा भाऊ जितेंद्रसिंग शंतरसिंग राजपूत या दोघांनी सुरेश बंजारा याला मारहाण केली होती. हे भांडण सुरू असतांना आसाराम छोटीलाल पवार रा. मेहरूण भांडण सोडवित असतांना संशयित आरोपीन कल्लूसिंग राजपूत याने चाकूने वार करून खून केला होता. तर दुसऱ्या घटनेत ४ फेब्रुवारी २०१५ रोजी पत्नी अनिता राजपूत हिला मुलबाळ होत नाही म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. या दोन्ही घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत रा. मेहरूण हा फरार होता. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना संशयित आरोपी कल्लूसिंग शंकरसिंग राजपूत हा एमआयडीसी परिसरात आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, असीम तडवी, चेतन सोनवणे, सचिन पाटील यांनी संशयित आरोपीला एमआयडीसी परिसरातून अटक केली. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.