जळगाव (प्रतिनिधी) येथील नेरी नाका स्मशानभुमीजवळ जुगार अड्ड्यावर रविवारी मध्यरात्री अप्पर पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांच्या पथकाने धाड टाकत ८ जुगारींवर कारवाई केली आहे.
स्मशानभुमिजवळ काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती लोहीत मतानी यांच्या पथकाला मिळाली होती. माहीतीची खात्री केल्यानतंर रविवारी मध्यरात्री २.३० वाजता पथकाने स्मशानभुमि जवळील एका मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. येथून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात राकेश अशोक सपकाळे (शिवाजी नगर) किरण भगीरथ पाटील (रा.शनिपेठ), फिरोज गुलाब पटेल (रा.सदाशिव नगर, मेहरुण), राकेश उष्णा गवळी, (रा.शनिपेठ), किरण रामदास झोपे (रा.शनिपेठ), कदीर शेख कबीर (रा.बळीराम पेठ), अनिल प्रकाश परतुरे (रा. कोळीपेठ) व दिनेश मधुकर साठे (रा.शिवाजीनगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी अजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा झाला असून संशियातांकडून १४ हजार ४५० रुपये रोख, ५० हजार रुपयांचे मोबाईल असा एकुण ६४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल व जुगारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.