Home क्राईम म्हाडा कॉलनीतून एकाची दुचाकी लांबविली

म्हाडा कॉलनीतून एकाची दुचाकी लांबविली


जळगाव प्रतिनिधी । शहरातील म्हाडा कॉलनी येथून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील म्हाडा कॉलनी येथे राहणारे दिलीप सुकदेव पाटील (वय-४७) हे ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला आहे. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएस १४६०) दुचाकी आहे. १७ मे रोजी सायंकाळी कामावरून घरी आले होते. रात्री त्यांनी दुचाकी आपल्या घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे १८ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही. दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  पोलीस नाईक मिलींद सोनवणे करीत आहे. 


Protected Content

Play sound