Home Cities अमळनेर उद्या अमळनेरात मराठा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उद्या अमळनेरात मराठा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
33

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स  न्यूज प्रतिनिधी | येथे अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे  रविवार  दि ९ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

राज्याचे विशेष सरकारी वकील पदमश्री अॅड. उज्वल निकम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अनिल भाईदास पाटील हे राहणार आहेत.  इयत्ता १० वी, १२ वी, विविध पदवी परीक्षेत तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंताचा सत्कार सोहळा येथील कै. सुंदराबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. ह्या सोहळ्याला अमळनेर तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांनी उपस्थिती द्यावी असे अवाहन अध्यक्ष जयवंतराव मंसाराम पाटील व संचालक मंडळ यांनी केले आहे.


Protected Content

Play sound