रिक्षाच्या वेगापुढे मर्सडिजचा स्पीड फिका : मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगापुढे मर्सडिजचा स्पीड फिका पडल्याचे म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टिका केली होती. “काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहर्‍यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना….” असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला होता.

त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे; कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे.” असे त्यांनी नमूद केले आहे.

यामुळे आता उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या थेट सामना सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात दोन्ही बाजू एकमेकांवर जोरदार प्रहार करत असल्याचे दिसून आले आहे.

Protected Content