Home राजकीय मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात


श्रीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी आता सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली असून या यादीत मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचेही नाव आहे. इल्तिजाची ही पहिलीच निवडणूक असून, तिला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बिजबेहारा येथून तिकीट देण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती आगामी विधानसभा निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे सोपवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. मेहबुबा यांनी यंदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला असून आता त्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे, इल्तिजा मुफ्ती यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्या ब-याच काळापासून पक्षप्रमुखांच्या मीडिया सल्लागार म्हणून काम करत आहेत.

 


Protected Content

Play sound