भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव-कंडारी या जिप गटातील आणि कुऱ्हा-वराड सीम गटातील बुथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, सर्व गावांचे सरपंच, भाजपा शाखा अध्यक्ष व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक खडके येथे आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरीकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थित खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजयजी सावकारे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ. सुनील नेवे सर, तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, भुसावळ विधानसभा विस्तारक दिनेश नेमाडे, पंस सभापती प्रीतीताई पाटील, पंस उपसभापती वंदना उन्हाळे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, माजी सभापती सुनील महाजन, सरचिटणीस भालचंद्र पाटील, सरचिटणीस नारायण कोळी, बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.