यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगरकठोरा येथे आज दिनांक ६ मार्च सायंकाळी यावल पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समिती बैठक पार पडली.
पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांनी १४ एप्रिल रोजी साजरी होणारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्याचबरोबर ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांची या बैठकीस उपस्थिती दिसून आली.
या संयुक्तिक बैठकीस सरपंच नवाज तडवी, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेंच सर्व ग्राम सुरक्षा रक्षक जवान, सर्व आदीवासी तडवी पंच कमिटी आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्य व कार्यकर्ते त्याचप्रमाणे गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
डोंगर कठोरा पीक संरक्षण सोसायटीच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या शांतता समितीच्या बैठकीस नवनियुक्त पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांनी सर्वांना कायद्या सुव्यवस्था विषयक तसेच चांगल्या नागरीकांचे कर्तव्य याची जाणीव करून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांच्या सोबत जेष्ठ सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठान होते . या बैठकीस गावाचे प्रथम नागरीक सरपंच नवाज तडवी, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, उपसरपंच धनराज पाटील यांच्या हस्ते पोलीस निरिक्षक कांबळे यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्राम पंचायतचे जेष्ठ सदस्य डॉ.राजेंद्र झांबरे, दिलीप तायडे व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते