Home Cities चोपडा सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पोलीस अधिकार्‍यांचे मार्गदर्शन

सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पोलीस अधिकार्‍यांचे मार्गदर्शन

0
28
jewellers association meeting chopda


jewellers association meeting chopda

चोपडा प्रतिनिधी । सराफ सुवर्णकारअसोसिएशनच्या गहना-घर येथे झालेल्या विशेष सभेमध्ये खबरदारीच्या उपाययोजनांबाबत पोलीस अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

सध्या वाढत असलेल्या चोरी,दरोडा व फसवणूकीचे वाढते प्रमाण बघता खबरदारीच्या उपाययोजना संदर्भात पो.नि.लोकरे, सपोनि तांदळे व पोलिस उपनिरीक्षक तुरनार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, कार्याध्यक्ष सुशिल टाटीया, उपाध्यक्ष द्वय संजय श्रावगी,राजेंद्र जैन, सुनील बरडिया, सचिव नरेंद्र तोतला यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत व सत्कार सराफ असो अध्यक्ष हिराचंद टाटीया, माजी अध्यक्ष शाम सोनार, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव शाम आबा सोनार यांच्या हस्ते करण्यात आले तर पोनि लोकरे यांच्या हस्ते कार्याध्यक्ष सुशिल टाटीया यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आदेश बरडिया, ललित टाटीया, गौतम जैन, हेमंत छाजेड, बबलू सोनार, चंद्रकांत सोनार,स्वप्निल पोतदार, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound