जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार असून, या अनुषंगाने मुख्य शासकीय समारंभाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात. प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून नेमून दिलेली कामे वेळेत व योग्य पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह महसूल विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरवठा विभाग, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, आरोग्य विभाग तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.



