यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाचे आदेश व सुचनाचे मार्गदर्शन करण्यासाठी मुस्लीम बांधवांच्या रमजान सणानिमित्ताने आज पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावल पोलीस स्टेशनच्या आवारात आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उद्यापासुन प्रारंभ होणाऱ्या पवित्र रमजान महीन्याच्या संदर्भात यावल शहरातील विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी , विविध मस्जीदचे मौलवी तसेच सामाजीक कार्यकर्ते व शांतता समितीच्या सदस्यांची शांतता समिती बैठक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली , दरम्यान या वेळी पोलीस निरिक्षक पाटील यांनी बैठकीत कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी रमजानच्या पवित्र महीन्यात सामुहीकरीत्या मस्जीद मध्ये रोजा (उपवास) सुटल्यावर महीन्याभर चालणाऱ्या तराबी नमाजचे पठण सामुहीक पद्धतीने न करता आपआपल्या घरातच कुटुंबासोबत नमाज पठण करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.
या बैठकीस शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान, डॉ .झाकीर हुसैन ऊर्दु हायस्कुलचे चेअरमन हाजी ईब्राहीम शेख, मौलाना अब्दुल रहीम, हबीब मंजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मन्यार, माजी नगरसेवक गुलाम रसुल उर्फ जग्गा मेंबर, माजी नगरसेवक हाजी याकुब शेख चॉंद, अनिस पटेल व आदी मुस्लीम बांधवांनी या बैठकीत भाग घेतला .