मुंबई वृत्तसंस्था । लोकसभा निवडणूक लढणार नसून, निवडणूक काळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदीविरोधाचे काम करावे, अशी स्पष्ट भूमिका घेणारे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले आहेत. राज यांनी काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला नसले तरी राजकीय वर्तूळात मोठी चर्चा आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होऊन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. पण मी याबाबत राष्ट्रवादीचे अजित पवार तसेच काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना भेटून शहानिशा देखील केली. मनसेविषयी अशी चर्चा बाहेर येणे योग्य नसल्याचे राज यांनी काल मनसेच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. मोदी आणि शहा यांच्याविरोधात लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज राज हे पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर गेले आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे आणि या भेटीत त्यांच्यात नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. राज यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला नसला तरी, त्यांनी राज ठाकरे यांची शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीकडे राजकीय क्षेत्रात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.