अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथील करुणा प्रकाश पाटील या कँन्सरग्रस्त आजाराने त्रस्त असलेल्या महिलेस उपचारासाठी आ शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी 1 लाख रु आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली आहे.
सदर पीडित महिला उपचारासाठी नाशिक येथील नवी संजीवनी कँन्सर रूग्णालयात दाखल आहे. उपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांच्या परिवाराने आमदार चौधरी यांच्या निदर्शनास आणून देताच आमदारांनी तात्काळ दखल घेत शासनाकडे पाठपुरावा केला,यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन १ लाख रूपयांची तातडीची आर्थिक मदत मिळाली आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पत्र प्रकाश पाटील रा वावडे यांना आमदार शिरीष चौधरी, डॉ प्रवीण पाटील, सुनील भामरे, हरिकृष्ण पाटील यांच्या उपस्थितीत कुटूंबियांना देण्यात आले. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या उपचारासाठी मी सदैव तत्परतेने काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार चौधरी यांनी यावेळी सांगितले.