‘विघ्नहर्ता’तर्फे पिंपळगाव हरेश्‍वरला १३ रोजी रोगनिदान शिबिर

vighnaharta super speciality hospital pachora

पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलतर्फे दिनांक १३ ऑगस्ट रोजी मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पाचोरा येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून तालुकाच नव्हे तर परिसरातील जनतेला अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सर्व शासकीय योजनांची मान्यता असल्यामुळे गोरगरीब रूग्णांना उच्च दर्जाचे उपचार अगदी मोफत मिळण्याची सुविधा येथे प्रदान करण्यात आलेली आहे. दरम्यान, विघ्नहर्तातर्फे ग्रामीण भागात विविध मोफत रोगनिदान व उपचार शिबिरांचे नियमितपणे आयोजन केले जात असून यात आता पिंपळगाव हरेश्‍वर येथील ग्रामविकास विद्यालयात मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचे आयोजन ग्रामस्थ मंडळी, डॉक्टर्स असोसिएशन व मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत करण्यात आले आहे.

या शिबिरात विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण मगर-पाटील व डॉ. सागर गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम. स्वामी, डॉ. विश्‍वेश रोठे, डॉ. राहूल पटवारी, डॉ. संदीप इंगळे, डॉ. प्रिती मगर, डॉ. अनुजा देशमुख व डॉ. प्रवीण देशमुख आदी तज्ज्ञ डॉक्टर्स रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणार आहेत. या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी दीपक गरूड-९६६५३४५०५२; रवी गिते-७५८८६४५४७१; निलेश पाटील-९७६५६१३९०२ आणि प्रितेश जैन-९६३७४७०१३२ यांच्याशी संपर्क साधावा. तर हॉस्पीटलमधील उपचारांसाठी ०२५९६-२४४००४ व २४४००५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण मगर-पाटील व डॉ. सागर गरूड यांनी केले आहे.

Protected Content