यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील कासारखेडा येथील मयत झालेल्या आदीवासी सालदाराचा यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अभावी शवविच्छेदन झाले नसल्याने मयताचे नातेवाईका कडुन व आदीवासी समाज बांधवांकडुन संत्पत प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की, कासारखेडा तालुका यावल येथे काल दिनांक ९ मार्च २०१९ रोजी कासारखेडा येथील संभाजी तोताराम पाटील यांच्या कासारखेडा शिवारातील खळवाडीत दुपारी ३ वाजेसुमारास त्यांचा सालदारा मांगीलाल रामु भिल याचा मृतदेह संयशास्पद अवस्थेत मिळुन आला होता, पोलीसांना कळविल्याने मयत मांगीलालचा मृतदेह शव विच्छेदना साठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात काल सायंकाळी ६ वाजेला आणले असता, मात्र ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना साठी सक्षम वैद्यकीय अविकारी नसल्याने मागील २० तासापासून मांगीलाल यांचा मृतदेह यावलच्या शवगृहात पडुन आहे. या बाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील यांच्याशी पत्रकारांनी दुरध्वनी वरून माहीती घेतली असता आपण त्या मृतदेहास शवविच्छेदनासाठी जळगावच्या सामान्य रुग्णालयात पाठवित असल्याचे त्यांनी सांगीतले.