यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची एमबीए प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.
(एम बी ए ऑनलाईन एन्ट्रन्स टेस्ट) प्रवेश परीक्षा ची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२१ ही आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, ycmou.digitaluniversity.ac सदर दिलेल्या लिंक वर प्रवेश परीक्षा फार्म भरायचा आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षा देण्यापूर्वी उमेदवारांनी पुढील दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
१.प्रवेश परीक्षा नोंदणी करून परीक्षा शुल्क ५००/- रुपये ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
२.प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केल्यानंतर उमेदवारास सराव चाचणी (मॉक टेस्ट) आणि मुख्य प्रवेश परीक्षा (मेन एंट्रेंस टेस्ट) देता येईल.
३ . प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी, पुढील प्रवेशासाठी यावल कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात वरील दिलेल्या तारखेच्या आत संपर्क साधावा असे आवाहन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीनीं व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे .