यावल, प्रतिनिधी । येथील रहीवासी असलेल्या मयुर सोनवणे यांनी आपल्या भागातील काही नविन कलाकारांना घेत पुणे येथून ‘आपला कट्टा-मराठी अड्डा’ या गृपच्या माध्यमातून एका शॉर्ट चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘ पादुका’ असे या लघु चित्रपटाचे नाव असून त्याचे पोस्टर आज पुणे येथे एका छोटेखानी कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले.
पादुका’ ही शॉर्ट फिल्म आपल्या गावातल्या खान्देशी भाषेत असेल. सध्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची शुटिंग पुणे येथे ऑगस्ट महिन्यात पुढे करण्यात येणार आहे. मयुर वसंत सोनवणे यांची र्निमती केलेले हे पहीलीच शॉर्ट चित्रपट असुन ते अजुन दोन शॉर्ट चित्रपट व एक वेब सिरीज पण करणार आहेत. त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ही कलाकार असतील. चित्रपटा चे लेखक व दिग्दर्शन स्वतः मयुर सोनवणे करणार आहेत. त्यात मुख्य भुमिकेसाठी अनुष्का मारुती पाटील, संतोष शिराळे, प्रतिक्षा सुर्यवंशी, योगेश्वर चित्ते, ज्योतिबा अनभुले, रवि निर्माळे, प्रतिभा भोसले, संजय मुंडीक, वैष्णवी माळी, धनराज अटवाल, संजय मकासरे, सुशांत मुंडीक, कृष्णा सोनवणे, अर्चना कुळकर्णी, रसिता शिंपी, पूर्णानंद मेहेंदळे,गौरव पाटील, अमोल मोहीते, संकेत शिंदे इत्यादी कलाकार या लघुचित्रपटात मध्ये आपली भुमिका साकारणार आहे. पुढील चित्रपटा मधील विविध भूमिका साकारण्यासाठी ते आपल्या गावातील कलाकारांना संधी देण्यासाठी इच्छुक असलेल्या तरूण प्रतिभावन कलाकारांना आपल्या अभिनयाव्दारे कला प्रर्दशीत करण्याची ही सुर्वण संधी असुन चित्रपटात काम करण्यासाठी मयुर सोनवणे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.