Home Cities जळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक: महायुतीकडून दीपमाला काळे व मनोज चौधरी यांचा अर्ज दाखल

महापौर-उपमहापौर निवडणूक: महायुतीकडून दीपमाला काळे व मनोज चौधरी यांचा अर्ज दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जी. एम. फाउंडेशन येथे आयोजित बैठकीत मंत्री ना. गिरीश महाजन यांनी महापौरपदासाठी दीपमाला काळे तर उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली.

या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते. महायुतीने एकजुटीने ही उमेदवारी जाहीर करत निवडणुकीत भक्कम लढत देण्याचा निर्धार व्यक्त केला.

घोषणेनंतर दीपमाला काळे आणि मनोज चौधरी यांनी महापालिका कार्यालयात जाऊन नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले. महापौरपदासाठी दीपमाला काळे यांनी दोन अर्ज दाखल केले. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून सूचित हाडा आणि अनुमोदक म्हणून डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून प्रकाश बालाणी आणि अनुमोदक म्हणून दीपक सूर्यवंशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी यांनी एक अर्ज दाखल केला असून त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून विष्णू भंगाळे आणि अनुमोदक म्हणून विक्रम उर्फ गणेश सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अर्ज दाखल करताना आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, नितीन बरडे, डॉ. चंद्रशेखर पाटील, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अमर जैन यांच्यासह महायुती नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, महापौर व उपमहापौर निवडीसाठी शुक्रवार ६ फेब्रुवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे पीठासन अधिकारी हे जिल्हाधिकरी रोहन घुगे हे असणार आहेत.

 


Protected Content

Play sound