हैदराबाद एन्काउंटर : आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल !

Hyderabad Encounter

हैदराबाद (वृत्तसंस्था) माझ्या मुलीचा मृत्यू होऊन १० दिवसांचा काळ लोटला आहे. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशा शब्दात, हैदराबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाल्यानंतर सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या महिला डॉक्टरच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

तर, हे आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले हे ऐकून मला अतिशय आनंद झाल्याचे बलात्काराची बळी ठरलेल्या महिला डॉक्टरच्या बहिणीने म्हटले आहे. हे चार आरोपी अशा प्रकारे एन्काउंटरमध्ये ठार झाल्याने हे एक उदाहरण म्हणून कायम राहील. अतिशय रेकॉर्ड वेळेत आम्हाला न्याय मिळाला आहे, असे म्हणत या बहिणीने त्यांच्या कुटुंबाला कठीण काळात साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीतील बलात्कार पिडीत निर्भयाच्या आई म्हणाल्या, या कामगिरीसाठी मी पोलिसांना खूप खूप धन्यवाद देते. प्रत्येक ठिकाणच्या पोलिसांनी अशाच प्रकारे काम करायला हवे. पोलिसांनी आपल्या या कामगिरीद्वारे एक चांगला पायंडा पाडून दिला आहे. पोलिसांनी जे केलंय ते योग्य केलंय त्यामुळे आता त्यांचे हात बांधण्याचे प्रयत्न होऊ नयेत.

Protected Content