Home Cities जळगाव मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

0
23

WhatsApp Image 2019 08 21 at 8.36.21 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न एस. एस. मणियार लॉ कॉलेज,आणि डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी साल २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षांच्या निकालांमध्ये विधी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत विद्यापीठासमोर उपोषण मांडले आहे.

आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही असा निर्णय घेऊन ते आमरण उपोषणास बसले आहे. यावेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशनने उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांना समस्यांमध्ये तथ्य आढळल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांसह जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी यावेळी आपल्या मागण्यांचा वरिष्ठांकडे पाठपुरावा करून आपणास न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी मौलाना आझाद फाऊंडेशनचेअध्यक्ष फिरोज शेख, प्रवीण पाटील, सलीम इनामदार, गणेश जोशी, निखिल पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound