Home Cities जळगाव आ.राजुमामांचे जळगाव शहरात जोरदार जनसंपर्क अभियान

आ.राजुमामांचे जळगाव शहरात जोरदार जनसंपर्क अभियान


aa.bholes abhiyan

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहराचे आमदार व भाजपचे उमेदवार राजूमामा भोळे यांनी शहरात जोरदार जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. त्याअंतर्गत त्यांनी आज (दि.५) सकाळी त्यांनी शहरातील भाऊंचे उद्यानात फिरायला येणाऱ्या लोकांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली.

 

त्याचवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील युती सरकारने गेल्या पाचवर्षात केलेल्या विकासाची माहिती पत्रकाद्वारे मतदारांपर्यंत पोहचवणे सुरु केले आहे. आज प्रभाग क्र ३ मधील अयोध्यानगरात अध्यक्ष प्रदीप रोटे, समाजसेवक विजय वानखेडे, युवामोर्चा अध्यक्ष अक्षय जेजुरकर व अन्य कार्यकर्त्यांनी पत्रकातील माहिती लोकांना सांगुन घराघरात प्रचार केला.


Protected Content

Play sound