संविधान दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘संविधान दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेत राज्यघटनेला मान्यता देण्यात आली होती. संविधान दिवसानिमित्त शासकिय कार्यलयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येते.

संविधान दिनानिमित्त जळगाव जिल्हा माहिती कार्यालयात देखील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन घेतले. याप्रसंगी प्रमोद भंगाळे, चेतन आहिरे. पंकज ठाकुर, उषा लोखंडे , भुषण सोनवणे, भुषण पाठक, वैशाली पाटील उपस्थित होते.

Protected Content