पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात माजी पालकमंत्री सतिश पाटील यांच्यासह इतरांनी सामुदाईक उपोषण केले आहे. आचारसंहिता लागू होण्यापुर्वी प्रकरणे रखडले असल्याने यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा पंचायत समितीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत विभागाने कार्यवाही केल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून पंचायत समिती गटविकास अधिकारी के.डी.शिंदे हे रजेवर आहेत. माजी पालकमंत्री सतिश पाटील यांनी प्रत्यक्ष दुरध्वनीवरून बोलणे झाल्यानंतर १ दिवस शिंदे हे कामावर आले. त्यानंतर ते रजेवर निघुन गेले. अनेक प्रकरणे रखडले आहेत. तेथे अधिकारी नसल्याने किंवा कोणालाही चार्ज दिलेला नसल्याने लोकांची कामे होत नाही. ४-५ दिवसांत आचारसंहिता लागू शकते. त्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी माजी पालकमंत्री सतिश पाटील यांच्यासह इतर सामुहिक उपोषणाला बसले आहे.