भुसावळ प्रतिनिधी । सर्व जाती-धर्माच्या अति आरक्षण पीडित प्रतिभावंतांना संविधानिक हक्क मिळावा, यासाठी येथील ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यदिनापासून जन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, 50 टक्के आरक्षण प्रतिभावंतांचे असून ते काढत केवळ मतांच्या पेटीसाठी याचा वापर करण्यात येतो. म्हणून या विरोधात दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त सकाळी 11 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी प्रतिभा बचाव देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संघटना, कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाचे उद्देश्य अति आरक्षणामुळे ओपन मेरिटच्या मुलांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणे हा असून आंदोलनात कुठल्याही जाति व धर्मांच्या विरोधात नाही. प्रसंगी डॉ. प्रदीप नाईक व राधेश्याम लाहोटी यांनी विचार मांडले. या कार्यक्रमात डॉ. दावलभक्त, डॉ. मंगेश खानापुरकर, अभिलाष नागला, डॉ. अर्चना खानापुरकर, अॅड गोपाल अग्रवाल, सत्यनारायण सोनी, विनोद शर्मा, अजय जैन, मनीषा काबरा, सारिका जैन, अदिती पांडे, विजयकुमार दूबे, नमा शर्मा, गौरव शर्मा, मुशा शहा मुराद शहा, जे.बी. कोटेचा व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पं रवि शर्मा यांनी परिश्रम घेतले.