दाऊद, हाफिज सईद, मसूद अजहर, लखवी दहशतवादी घोषित

download 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर, लश्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व झकी-उर-रहमान लखवी यांना कायदेशीररीत्या दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

 

या सर्वांना नव्या ‘बेकायदा कारवाया प्रतिबंध’ (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन अॅक्ट) अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर याचा या यादीत पहिला नंबर आहे. तर दहशतवादी संघटना ‘जमात उद-दावा’चा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा दुसरा नंबर आहे. तिसऱ्या नंबरवर गँगस्टर माफिया डॉन दाऊद इब्राहीम आहे. तर झाकिर उर रहमान लखवी हा मुंबईवर 2008 साली झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड होता. त्याच्याकडे भारविरोधी कारवाईचे पुरावे मिळाले आहेत. हे सर्वजण सध्या पाकिस्तानात आहे.

Protected Content