Home Cities यावल मशाल ज्योती पदयात्रेत डॉ. कुंदन फेगडेंनी घेतला सहभाग

मशाल ज्योती पदयात्रेत डॉ. कुंदन फेगडेंनी घेतला सहभाग


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल शहरात आज घटस्थापनेच्या निमित्ताने तरुणांच्या विविध संघटनांच्या वतीने व डॉ. कुंदन फेगडे यांच्या सहभागाने मशाल ज्योत पदयात्रा काढण्यात आली. या मशालज्योत पदयात्रेत हिंदू घोष ग्रुप, स्वराज मंडळ,पाटील वाडा भुसावळ यांची यावल येथील श्रीमनुदेवी ते भुसावळ पायी मशाल ज्योत पदयात्रा काढण्यात येवुन पदयात्रेचा समारोप भुसावळ येथील पाटील वाडयात झाला.

सदरची मशाल ज्योत पदयात्रा ही यावल शहरातून घेऊन जात असताना भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस व युवा तरूणांचे नेतृत्व डॉ. कुंदन फेगडे यांनी या मशाल ज्योत पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी गणेश पाटील, गौरव जाधव,भूषण वाघुळदे,सागर चौधरी, निलेश पाटील, मनीष विश्वकर्मा, योगेश पाटील, सोनू भंगाळे, दुर्गेश जाधव,तुषार जाधव, गौरव कोळी, युवराज जाधव, नयन पाटील,रोहित पाटील, रोहन पाटील, तुषार पाटील,भावेश पाटील, अर्जुन पाटील,गौरव गरुड, हेमंत पाटील ,रुपेश नेहते,रितेश चौधरी,कुणाल येवले,विशाल ठाकूर या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, भेट झाली. त्या सर्वांना मानाची टोपी देऊन त्यांचा सत्कार केला. कार्यकर्ते आनंदीत झाले.


Protected Content

Play sound