जळगाव प्रतिनिधी | ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला मारून टाकीन…’ अशी शहरातील तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीसात तरुणावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, जुने जळगाव येथील रेहान शेख या तरुणाने शहरात राहणाऱ्या एका तरुणीचा फोन नंबर मिळविला. त्यांनतर फोनवरून तुच्याशी संवाद साधत “तू मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू मला भेटली नाही तर मी तुला मारुन टाकीन” अशी धमकी दिली. यासंदर्भात तपास करत आज शनिवार, १५ जानेवारी रोजी सायंकाळी दि.रेहान शेख याच्याविरोधात एम.आय.डी.सी. पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

गुरुवार, दि.६ जानेवारी रोजी सायंकाळी रेहान शेख याने शहरातील १९ वर्षीय तरुणीस मोबाईलवरुन संपर्क साधत “तू मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू मला भेटली नाही तर मी तुला मारुन टाकीन” अशी धमकी दिली. याप्रकाराने घाबरत तरुणीने आपल्या कुटुंबियांना सदर प्रकार सांगितला. आणि शनिवार, दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तरुणीच्या तक्रारीवरून रेहान शेख याच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहेत.


