पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग; एकाला अटक

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला अंगावर ॲसीड फेकण्याची आणि पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत पैशांची मागणीकरत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीवारी २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात ३५ वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलांसह वास्तव्याला आहे. सरकारी नोकरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत संशयित आरोपी अब्दुल रहीम शेख वय २७ रा. स्टेट कॉलनी, भुसावळ याने महिलेला संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच अश्लिल चाळे करत विनयभंग केला, त्याचप्रमाणे पैशांची मागणी करत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि पतीसह मुलाला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार असहय्य झाल्याने महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार संशति आरोपी अब्दुल रहीम शेख वय २७ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुपडा पाटील हे करीत आहे.

Protected Content