Home Cities अमळनेर विवाहितेचा विनयभंग करत परिवाराला बंदुकीच्या गोळीने ठार मारण्याची धमकी

विवाहितेचा विनयभंग करत परिवाराला बंदुकीच्या गोळीने ठार मारण्याची धमकी


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंदुकीच्या गोळीने पती, जेठ व जेठाणीला संपवून टाकेल अशी धमकी देवून विवाहितेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना अमळनेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील एका गावातील एका भागात ३८ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह राहते. मंगळवारी १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता गावात राहणारा संशयित आरोपी अरूण दौलत संदानशिव याने पिडीत महिलेला अश्लिल शिवीगाळ करत तिच्या पतीसह जेठ व जेठाणी यांना बंदूकीच्या गोळीने ठार करण्याची धमकी दिवून विवाहितेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अरूण दौलत संदानशिव रा. अमळनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई हे करीत आहे.


Protected Content

Play sound